कधी शिवराय यायचे तरी
कधी शिवराय यायचे तरी
दिवाळी दसरा मिळुनी सोहळा आता व्हायचा घरी
सडा केशरी शिंपिन दारी
रांगोळी घालीन किनारी
गरिबाचे घर जाईल उजळून राजमंदिरापरी
छत्रपतीच्या सरदाराशी
मराठमोळ्या दिलदाराशी
ठरले माझे लगीन, पडतील तांदूळ डोईवरी
मिळता आशीर्वाद तयांचा
साक्षात्कारच चैतन्याचा
मीच नव्हे उठतात शिरा या अमृत प्याल्यापरी
दिवाळी दसरा मिळुनी सोहळा आता व्हायचा घरी
सडा केशरी शिंपिन दारी
रांगोळी घालीन किनारी
गरिबाचे घर जाईल उजळून राजमंदिरापरी
छत्रपतीच्या सरदाराशी
मराठमोळ्या दिलदाराशी
ठरले माझे लगीन, पडतील तांदूळ डोईवरी
मिळता आशीर्वाद तयांचा
साक्षात्कारच चैतन्याचा
मीच नव्हे उठतात शिरा या अमृत प्याल्यापरी
गीत | - | कवी संजीव |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | थोरातांची कमळा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रभो शिवाजीराजा |