काका काका मला वाचवा
काका काका मला वाचवा, आले गारदी त्यांस थाबवा
मिठी मारतो कमरेला मी, पाया पडतो पुन्हा पुन्हा
काय असे पण केले हो मी? चूक जाहली काय दाखवा
माधवदादा अखेरीसला तुमच्यापाशी काय बोलला
नारायण ओटीत टाकला तुम्हीच त्याचे आईबाप व्हा
बोलत नाही का हो काका, शब्द कालचे विसरलात का?
काकी तूही गप्प उभी का, पोरावर का राग धरावा?
लोभ कशाचा इथला नाही, राज्य नको मज नकोच काही
तुम्हास घ्या हो पेशवाई ही, खड्गाचा पण वार आडवा

गीत | - | श्रीनिवास खारकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Print option will come back soon