कांचनस्वप्ने नाचत उधळत
कांचनस्वप्ने नाचत उधळत हसली रात पुनवेची
श्यामसुंदरासवे रंगली राधा गोकुळची
राजस श्रीहरी मदन जणू तो
कस्तुरी-मळवट भाळी शोभतो
हार फुलांचा कंठी रुळतो
अधरी पावा वाजवी मंजुळ, माखली उटी चंदनाची
राधेचा घननीळ सावळा
गोकुळचा तो मुरलीवाला
घुमवित आला सप्तसुराला
गोकुळचा तो मुरलीवाला, चोरिली नीज राधिकेची
यमुनालहरी हरिगुण गाती
पायी पैंजण रुणझुणु करती
वाजवी पावा तो जगजेठी
रंगले गोकुळ रंगली गौळण, रंगली सखी मोहनाची
श्यामसुंदरासवे रंगली राधा गोकुळची
राजस श्रीहरी मदन जणू तो
कस्तुरी-मळवट भाळी शोभतो
हार फुलांचा कंठी रुळतो
अधरी पावा वाजवी मंजुळ, माखली उटी चंदनाची
राधेचा घननीळ सावळा
गोकुळचा तो मुरलीवाला
घुमवित आला सप्तसुराला
गोकुळचा तो मुरलीवाला, चोरिली नीज राधिकेची
यमुनालहरी हरिगुण गाती
पायी पैंजण रुणझुणु करती
वाजवी पावा तो जगजेठी
रंगले गोकुळ रंगली गौळण, रंगली सखी मोहनाची
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | गोविंद पोवळे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, कल्पनेचा कुंचला, भावगीत |
कांचन | - | सोने. |
जगजेठी | - | जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर. |
पावा | - | बासरी, वेणु. |