A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करी दिवसाची रात माझी

करी दिवसाची रात माझी सोडि ना वाट
याच्या डोक्यात अक्कल पिकवा
कुणी माझ्या रायाला शानपन शिकवा

आड वाटेनं हेरतो मला
तर्‍हेतर्‍हेची करतो कला
कुणी रायाचा रस्ता चुकवा
कुणी माझ्या रायाला शानपन शिकवा

किती किती सवाल याचं घेऊ
किती किती जवाब मी देऊ
बोल बोलून आला थकवा
कुणी माझ्या रायाला शानपन शिकवा

नाही इचार मनात दुसरा
याच्या गाडीला लागलाय घसरा
लाल कंदील याला कुणी दाखवा
कुणी माझ्या रायाला शानपन शिकवा
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - वसंत पवार
स्वर- सुलोचना चव्हाण
गीत प्रकार - लावणी