कर्ण तो पांडव रे पहिला
सांगते कुंती कृष्णाला
कर्ण तो पांडव रे पहिला
नऊ मास मी जपला उदरी
परि न घेतला आडवा पदरी
नाही कधी मायेने चुंबिला
करुनी फुलाची परडी श्यामा
बाळ धाडिला मी निजधामा
रुदन ध्वनी त्याचा न ऐकिला
कुंवारपणीचे ते आईपण
जलदेवींना केले अर्पण
जळामध्ये मी बाळ सोडिला
कर्ण तो पांडव रे पहिला
नऊ मास मी जपला उदरी
परि न घेतला आडवा पदरी
नाही कधी मायेने चुंबिला
करुनी फुलाची परडी श्यामा
बाळ धाडिला मी निजधामा
रुदन ध्वनी त्याचा न ऐकिला
कुंवारपणीचे ते आईपण
जलदेवींना केले अर्पण
जळामध्ये मी बाळ सोडिला
| गीत | - | ग. दि. माडगूळकर |
| संगीत | - | वसंत पवार |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | वहिनींच्या बांगड्या |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले