A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कसली जिवाला भूल पडे

कसली जिवाला भूल पडे?
हरीच्या मुरलीवर जीव जडे !

श्यामल श्यामल मेघा बघुनी
श्याममयी मी जाते बनुनी
स्वप्‍न म्हणू की हे जागेपण, माझ्यासंगे नाचे मोहन !
श्याम श्याम श्याम
घनश्याम श्याम श्याम
श्याम श्याम श्याम
मुखी हेच नित्य नाम, संसार मनातुनी गळून पडे !

मज वेडीला निंदा-वंदा
मी तर वरीले बाल मुकुंदा
लाज मजसी, मजसी न भीती, माझी हरीवर अक्षय प्रीती !
श्याम श्याम श्याम
घनश्याम श्याम श्याम
श्याम श्याम श्याम
मुखी हेच नित्य नाम, त्याच्याविण माझा घास अडे !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.