A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खरा तो प्रेमा ना धरि

खरा तो प्रेमा ना धरि लोभ मनीं ॥

नभिं जनहितरत भास्कर तापत,
विकसत पहा नलिनी ॥

पिडित जन देखतां, स्वसुखा त्यागी दया ।
जनभयहरण हेंचि सुख, सदया देवराया ।
दर्शन गुणवंताचें नाचवी प्रेमलहरी ।
गुणरसपान हेंचि सुख, प्रेम तया नांव जनीं ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- माणिक वर्मा
बालगंधर्व
आशा खाडिलकर
मधुवंती दांडेकर
कीर्ती शिलेदार
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मानापमान
राग - पहाडी, मांड
ताल-केरवा
चाल-सखेरी मैका पिया बिन
गीत प्रकार - नाट्यसंगीत
नलिनी - कमळ.
भास्कर - सूर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  माणिक वर्मा
  बालगंधर्व
  आशा खाडिलकर
  मधुवंती दांडेकर
  कीर्ती शिलेदार