A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खेळ तुझा न्यारा

तुझे सर्वरंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला?
खेळ तुझा न्यारा, प्रभु रे खेळ तुझा न्यारा!

स्वार्थाभवती दुनिया फिरते
बेइमान ठरते भलाई, बेइमान ठरते
सौद्यासाठी जुळते नाते फसवा भावफुलोरा!

आशेमधुनी जीवन फुलते
मरणाशी अडते पाऊल, मरणाशी अडते
हे मायावी मृगजळ खोटे उरतो दूर किनारा!

दोन दिसांची सगळी नाती
कुणी न उरे अंती सोबती, कुणी न उरे अंती
पैलतिराची हाक ऐकता स्मरतो एक सहारा!
मृगजळ - आभास.