किती जिवाला राखायाचं
किती जिवाला राखायाचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
रंग पैठणीचा लाल
जरिटिक्याचा महाल
मन झालंया बेताल
लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं
राया माझ्या देहात काहूर पेटलं
असे गाणेच ओढाळ
पायी थांबेनाच चाळ
उडे धुळीत गुलाल
मला गुलाली न्हाताना पाहिलं
आणि उभ्या सभेत वादळ वाह्यलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं
रंग पैठणीचा लाल
जरिटिक्याचा महाल
मन झालंया बेताल
लाख डोळ्यांनी अंग माझं बाटलं
राया माझ्या देहात काहूर पेटलं
असे गाणेच ओढाळ
पायी थांबेनाच चाळ
उडे धुळीत गुलाल
मला गुलाली न्हाताना पाहिलं
आणि उभ्या सभेत वादळ वाह्यलं
| गीत | - | ना. धों. महानोर |
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
| स्वर | - | लता मंगेशकर |
| गीत प्रकार | - | लावणी |
| ओढाळ | - | चंचल, स्वैर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












लता मंगेशकर