A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कितीतरी दिवसांनी आज

कितीतरी दिवसांनी आज थांबला पाऊस!
रंगीबेरंगी फुलांना लागे प्रकाशाचा ध्यास!

आज बर्‍याच दिसांनी झाले मोकळे आभाळ!
दूर तरळे ढगांची शुभ्र मुलायम माळ!

किती दिसांनी पडले ऊन्ह पिवळे धमक,
किरणांच्या वर्षावात न्हाते सावळी सडक!

आणि पाहता सहज जरा मान वळवून,
कैफ जुनाच दाटला माझ्या नसांनसांतून

तोच मोहक चेहरा, त्याच गोड खळ्या गाली,
"आले भरून आभाळ पुन्हा वीज चमकली!"
गीत- सुरेश भट
संगीत - नरेंद्र भिडे
स्वर - राजेश दातार
गीत प्रकार - ऋतू बरवा भावगीत
  
टीप -
• पुणे आकाशवाणी नभोमालिका 'आनंदलोक' मधील पद.