A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कोण तुजसम सांग मज

कोण तुजसम सांग मज गुरुराया । कैवारी सदया ।
पाहिजे तें अंगीं स्वीकाराया । भवदुःख हराया ॥

तूंचि विष्णु, तूंचि शिव, तूं धाता । तूं विश्वंभरता ।
तूंचि व्यापकव्याप्यातें प्रसवीता । तूं मायेपरता ॥

तूंचि शिष्या पोसणारी माता । तूं विद्यादाता ।
तूंचि देशी तत्त्वनिधी निजहाता । तारक बलवंता ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- छोटा गंधर्व
अजितकुमार कडकडे
रामदास कामत
विश्वनाथ बागुल
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - मिश्र पिलू
चाल-धन्य दिवस आज वर्णू
गीत प्रकार - नाट्यसंगीत
धाता - ब्रह्मदेव, निर्माता.
निधी - खजिना.
परता - पलीकडचा.
भव - संसार.
व्याप्य - व्यापले जाणारे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  छोटा गंधर्व
  अजितकुमार कडकडे
  रामदास कामत
  विश्वनाथ बागुल