A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कृष्ण तुझा बोले कैसा

कृष्ण तुझा बोले कैसा ऐक ग यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
परतुनी मला दे

दिवसभरी पाठीलागे, पाठ सोडी ना गे
किती किती समजूत घालू, किती भरू रागे
थोर घरी उपरे परि हे पोर नव्हे साधे

कटिस मिठी मारी झोंबे, मागतो रडूनी
निरी धरून येऊ बघतो वरी हा चढोनी
बाळपणी जाईल वाया जन्म अशा नादे

दिले यांस साखर-लोणी, दिल्या दूध-लाह्या
नवी दिली चेंडू-लगोरी, सर्व जाय वाया
बरी नव्हे सवयी असली, तूच या सजा दे
कटि - कंबर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.