A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणा न दिसता कोण चालवी

कुणा न दिसता कोण चालवी
अवघा संसार
कळसुत्री बाहुली खेळवी,
कोण सूत्रधार?

अपुले येणे अपुले जाणे
सहज बोलणे मंजुळ गाणे
अपुल्या करवी तोच करवितो
सारे व्यवहार

आयुष्याचे रंगीत नाटक,
तोच तयाचा कर्ता नायक
अपार लीला त्याच्या,
त्याचे अनंत अवतार

ठाव तयाचा कुणा माहिती
जरी वसे तो अवतीभवती
असून अपला अनोळखी हा
जवळ असून दूर