A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणाच्या खांद्यावर कुणाचें

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें?

कशासाठी उतरावें तंबू ठोकून?
कोण मेलें कुणासाठी रक्त ओकून?
जगतात येथें कुणी मनांत कुजून !
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारांत गोठून, झडून.
जीवनाशीं घेती पैजा घोकून घोकून,
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे !

अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणीं म्हणजे पोकळ समाधी.
देई कोण हळी, त्याचा पडे बळी आधी,
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
गीत - आरती प्रभू
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर- रवींद्र साठे
चित्रपट - सामना
गीत प्रकार - चित्रगीत
हळी (हाळी) - आरोळी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.