A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणाला सांगू माझी व्यथा

कुणाला सांगू माझी व्यथा?
प्राजक्ताच्या प्रासादावर पडली विद्युल्लता!

प्रलयाचे हे भीषण तांडव, डळमळला गगनाचा मांडव
थरथरत्या पृथ्वीवर नाचे तिमिरदैत्य एकटा!

कशास घडल्या अपुल्या भेटी, कशास जडली वेडी प्रीती
मीलन अपुले ठरली आता स्वप्‍नामधली कथा!

कोण निवारील घोर अनर्था, तूच प्राण तू जीवन पार्था
ये विझवाया हा दावानल शिंपाया अमृता!
गीत- शांताराम आठवले
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले
चित्रपट- सुभद्राहरण
गीत प्रकार - चित्रगीत
दावानल - वणवा.