A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुंजात मधुप गुंजारव

कुंजात मधुप गुंजारव यमुनातटीं ।
होळी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥

सुरताल पखवाज खंजिरी मंजिरीत बासरी ।
बिन अमृत कुंडली कुणी डफ सारंगीला धरी ।
नृत्यकृत्य तत्कार तान करताल झुमकझ्या अंतरीं ।
मोरचंग झांजरी पतीसंपत्यही नानापरी ।
रुपरम्य राधेचे राधावल्लभ आपण घरी ।
तिलोत्तमा उर्वशी मेनका रंभापरी घाबरी ।
फागामधीं बागात मातला वसंत अंत:पुरीं ।
कवण राधिका पति कवण राधा हे नकळे खरी ।
अग सखे ग आनंद मी ग सांगू किती ।
कुंकुम अबीर झोकिती पिचकार्‍या मुखी मारिती ।
या रसाचा कोण जाणता सुरनर हातवटी ।
होरी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी ॥
अंत:पुर - राणीवसा, अंतर्गृह, माजघर.
अबीर - एक सुगंधी पूड.
कुंज - वेलींचा मांडव.
कवण - कोण ?
खंजिरी - घुंगरू लावलेला डफ.
गुंजारव - भुंग्याचा गुणगुण नाद.
झुमकणे - ठुकत चालणे.
झांझरी - लहान झांज.
पखवाज - एक प्रकारचे तालवाद्य.
फाग - फाल्गुन.
मंजिरी - एक प्रकारचे घनवाद्य.
मातणे - उन्मत्त होणे.
सुर - देव.
हातवटी - कुशलता, योग्यता.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.