A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुठं कुठं जायाचं हनिमूनला

अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं
हेरलं ते हेरलं अन्‌ लगीन अपुलं ठरलं

लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो ठरलं

लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

रातभर एकली जागू कशी?
सासूला अडचण सांगू कशी?
घरात पाव्हणं न्‌ दारात मेव्हणं
एकान्‍त मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

न‍उवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न्‌ येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?