A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुठला मधु झंकार

कुठला मधु झंकार?
तुटता आता अशी अचानक ही वीणेची तार

गाऊ कशी मी नवे तराणे
राग विसरले जुने-पुराणे
केविलवाणे, अबोल गाणे
आज जीवाभावाची माझी बनली मुकी सतार

भग्‍न मनोरथ उधळित सारे
आकांक्षांचे हिरेच गहिरे-
जसे विखुरले नभात तारे
विस्कटला रात्रीचा सालस सुनासुना संसार

नवजीवनसंगीत हरपले
दोघांचे काळीज करपले
सोनेरी सुखस्‍वप्‍न भंगले
कोंदटला मनीं भीषण भयकर कोलाहल अंधार
गीत - स. अ. शुक्ल
संगीत - यशवंत देव
स्वर- श्यामा चित्तार
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.