A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुठे ठेऊ ही ठेव सुखाची

कुठे ठेऊ ही ठेव सुखाची
चंद्रकलेसम खुलुनी आली मेंदी माझ्या नखानखाची !

सुखासवांनी भरले डोळे
त्यात सख्याचे रूपच तरळे
अंगाअंगावर आली धुंदी प्रेमरसाची, सहवासाची !

हळुच तयांनी धरिता बोटे
सुखास झाले गगन धाकटे
बधीर झाली अवघी बोटे, मूठ उघडली नवलाखाची !

मनास आता ठाव कोठला?
तिथे उद्याचा गाव थाटला
तनामनांतरी मावेना ही अमोल दौलत आनंदाची
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- आशा भोसले
चित्रपट - तू सुखी रहा
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.