लाल पैठणी रंग माझ्या
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
उगा मस्करी करीन कशाला
तुमच्यासाठी सजला बंगला
अशी नार झुबेदार, हिचा कोण भर्तार
हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार
घट्ट नेसून हिंडते नऊवार
गोर्या पायात पैंजण रुमझुमला
तुमी यावं सजण रंग होळीला
शपथ गळ्याची तुम्हा सांगते
सारा शिणगार घेऊन बसते
रूप हीचं रूपखनी, नाही हळू पाही कुणी
कुंकू भरलं कपाळी भरदार
हिच्या अंगावर सोन्याची जरतार
माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
तुमी यावं सजण रंग होळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
उगा मस्करी करीन कशाला
तुमच्यासाठी सजला बंगला
अशी नार झुबेदार, हिचा कोण भर्तार
हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार
घट्ट नेसून हिंडते नऊवार
गोर्या पायात पैंजण रुमझुमला
तुमी यावं सजण रंग होळीला
शपथ गळ्याची तुम्हा सांगते
सारा शिणगार घेऊन बसते
रूप हीचं रूपखनी, नाही हळू पाही कुणी
कुंकू भरलं कपाळी भरदार
हिच्या अंगावर सोन्याची जरतार
माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
तुमी यावं सजण रंग होळीला
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | आनंद मोडक |
स्वर | - | आशा भोसले, चंद्रकांत काळे |
चित्रपट | - | एक होता विदूषक |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
खनि | - | खाण. |
भर्तार (भर्ता) | - | नवरा, पती / स्वामी. |