A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लहरत-लहरत बहरत-बहरत

लहरत-लहरत बहरत-बहरत आली
दंवबिंदूंचे मोती आणि धुके रेशमी ल्याली
प्रिया लाजली गोड गाली
माझी, प्रिया लाजली गोड गाली

आसही तू, ध्यासही तू, श्वासही तू
सभोवती घमघमता मधुमासही तू
तुझ्यामुळे मी फुललो, तुझ्यामुळे दरवळलो
पहा पहा न सखये, तुझ्यामुळे मोहरलो
तुझ्यामुळे ही आयुष्याची पहाट सुंदर झाली
प्रिया लाजली गोड गाली
माझी, प्रिया लाजली गोड गाली

दे कोमल हात तुझा दे हाती
तू मजला कर अपुला सांगाती
ललाट रेषेवरती कोरलीस तू प्रीती
बनविलेस तू मजला तुझाच जीवनसाथी
रिमझिम रिमझिम स्वर्गसुखाची अमृतवर्षा झाली
प्रिया लाजली गोड गाली
माझी, प्रिया लाजली गोड गाली
गीत- इलाही जमादार
संगीत - हर्षित अभिराज
स्वर - एस्‌. पी. बालसुब्रमण्यम
अल्बम- निशिगंध
गीत प्रकार - भावगीत
ललाट - कपाळ.