A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लाख दिवे लखलखती

लाख दिवे लखलखती
तारा जणू नभा हसती
दीपावली येई आज आनंदा ये भरती

बाला किती अंगणात
रंगावली रेखितात
भरजरीची नववसने तनुवरती झगमगती

पंचारती करी उजळे
चंद्रज्योती नयनी खुले
पतीलागी प्रेमभरे ओवाळिती नवयुवती

मंगलदिन मंगलसण
देई जगा संजीवन
मंगलमय भाव नवे, नव आशा मनी फुलती
चंद्रज्योती - चंद्रजोती. चंद्रासारखा प्रकाश देणारे दारुकाम (भुईनळा, चक्र, इ.)
रंगावली - रांगोळी.
संजीवन - पुनुरुज्‍जीवन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.