A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लपविला लाल गगन-मणि

लपविला लाल गगन-मणि, परि दिन अशुभ होत नच,
दृष्टि न विफला, मगध-समरपति नव रवि उगवला ॥

योग्यचि वर मम, सुखविल बाला,
शुभ दिन अजि सुता, वरिल बघ शिशुपाला ॥
गीत- कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर - कल्याणी देशमूख
नाटक- संगीत स्वयंवर
राग- तिलंग
ताल-त्रिवट
चाल-मोहेलीना नेक नजर यानी
गीत प्रकार - नाट्यगीत
शिशुपाल - श्रीकृष्णाचा मामेभाऊ. रुक्मिणीचा विवाह याच्याशी करावा असा भीष्मकाचा (तिच्या वडिलांचा) बेत होता.