A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लपून बसली राधा गौळण

लपून बसली राधा गौळण
वेडा होऊन शोधी मोहन

इथे धुंडितो, तिथे धुंडितो
न मिळे राधा, व्यथित हिंडतो
लपल्या जागी हसते राधा
श्रीकृष्णाला दु:खी पाहून

हळवे झाले मन राधेचे
बघवेना ते दु:ख हरीचे
हळूच येऊन नयन झाकिते
हरी नाचतो हर्षे न्हाऊन

वेडी राधा वेडी राधा
फसवू बघते जगदानंदा
गोपाळांचा बनून सौंगडी
लीला-नाटक दावी मोहन

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.