लोक का करतात प्रीती
लोक का करतात प्रीती कळत नाही
का फुले होतात माती कळत नाही
मंद नंदादीप जेथे हा पुरेसा
वीज दाहक का रुचावी कळत नाही
थांबते तृष्णा उरीची मधुघटांनी
मिटविशी ती का विषाने कळत नाही
या दिशा सोडून सार्या ओळखीच्या
वाट परकी आवडे का कळत नाही
का फुले होतात माती कळत नाही
मंद नंदादीप जेथे हा पुरेसा
वीज दाहक का रुचावी कळत नाही
थांबते तृष्णा उरीची मधुघटांनी
मिटविशी ती का विषाने कळत नाही
या दिशा सोडून सार्या ओळखीच्या
वाट परकी आवडे का कळत नाही
गीत | - | वसंत निनावे |
संगीत | - | वीरधवल करंगुटकर |
स्वर | - | कांचन |
गीत प्रकार | - | भावगीत |
तृष्णा | - | तहान. |