A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मदनाची मंजिरी साजिरी

मदनाची मंजिरी । साजिरी । उषाच हंसरी
चंद्रिकाच कोंवळी । काय ही नाजुक चांफेकळी?

रसिक मनोहारिणी घटीं या रसिक-चित्त भरुनी
कुरंग-नयना कुठें आजला गज-गमना चालली?

उरोज कुंभापरी रम्य हा कुंभ शोभतो शिरीं
सुधा-कुंभ घेउनी येइ का रंभा वसुधातलीं?
कुरंग - हरिण.
घटी - घटका, वेळ.
चंद्रिका - चांदणे.
वसुंधरा (वसुधा, धरा) - पृथ्वी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.