A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मागता न जेथे मिळते

मागता न जेथे मिळते
बोलता न सारे कळते
त्या नगरीची राणी सखया
प्रीत तुझी रे करिते किमया

सौंदर्याला रूप न जेथे
सुगंध मोहक फूल न दिसते
चंद्राविण त्या चांदराती
वसंत नसता कोकिळ गाती
वृक्षाविण रे जेथे छाया
प्रीत तुझी रे करिते किमया

मंदिर आहे; मूर्ती न दिसते
भक्ताविण ती भक्ती वसते
तिलोत्तमेची माया तेथे
मछिंद्र सारे जिंकुन नेते
मायावतीला त्या जाऊया
प्रीत तुझी रे करिते किमया
गीत - पी. सावळाराम
संगीत - सुधीर फडके
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - माय बहिणी
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.