A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मागते मन एक काही

मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
उमलण्या आधीच कैसे फूल पायी तुडविते !

खेळ नियती खेळते की पाप येते हे फळा
वाहणार्‍या या जळाला कोण मार्गी अडविते?

ईश्वरेच्छा हीच किंवा संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते?
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.