A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मज जन्म देइ माता

मज जन्म देइ माता । परि पोशिलें तुम्ही ।
निजकन्यका गणोनी । न कांहीं केले कमी ॥

उपकार जे जहाले । हिमाद्रितुंगसे ।
शत जन्म घेउनी ते । फेडीन काय मी ॥

सदया मनासि ठेवा । आपुल्या असे सदा ।
उपकारबद्ध तनया । तुमची पदें नमी ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- बालगंधर्व
नाटक - एकच प्याला
राग - पहाडी
ताल-धुमाळी
चाल-दिल बेकरार तूने
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.