मज खेळणी नको ती
मज खेळणी नको ती
जादू नको नवी, आई मला हवी !
रगडून अंग माझे घालील रोज न्हाऊ
शाळेत खावयाला देईल गोड खाऊ
रात्री कुशीत घेई, मज रोज झोपवी
खोड्या करून येता मज रागवील खोटे
गालांवरून माझ्या फिरविल गोड बोटे
सांगे 'शुभंकरोती', देवास आळवी
जादू नको नवी, आई मला हवी !
रगडून अंग माझे घालील रोज न्हाऊ
शाळेत खावयाला देईल गोड खाऊ
रात्री कुशीत घेई, मज रोज झोपवी
खोड्या करून येता मज रागवील खोटे
गालांवरून माझ्या फिरविल गोड बोटे
सांगे 'शुभंकरोती', देवास आळवी
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | शारंग देव |
स्वर | - | साधना सरगम |
गीत प्रकार | - | बालगीत |