A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझे मलाच आता जगणे

माझे मलाच आता जगणे कबूल नाही
हलत्या कलेवराचे फिरणे कबूल नाही.

भरल्या खतावण्या या, काळ्या-निळ्या वळांनी
ही टवटवीत दु:खे अजुनी मलूल नाही.

सांगू कशास आता जगण्यास लाख सबबी
शब्दांस आज नटवी मखमली झूल नाही.

मिटल्या मना पटेना ही हूल कौतुकाची
गुंतेल पाय असले, कुठलेच खूळ नाही.
कलेवर - शरीर.
खतावणी - रेघा, ओरखडे.