A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझी आगबोट चालली

माझी आगबोट चालली दरियात ग !
मन धावत तरी तव हृदयात ग

पाचूवाणी जळावरी मोत्यांवाणी फेंस
खेळताना म्हणे मातें "मोदें बाळा हास"
पिशावाणी उदास मी, एक तुझा ध्यास
पाचूवाणी नेत्रीं तुझ्या मोतीं ठाव घेत ग !

आशेने मीं आकाशात पाहियलें जधीं
तुझीं प्रेमपुष्पें शुभ्र आलीं वाटे तधीं
परि हाय ! पक्षी ते ग स्वैर वार्‍यामधीं
सान बाळापरी मज कुणी फसवीत ग !
गीत - बा. भ. बोरकर
संगीत -
स्वर- मीनाक्षी शिरोडकर
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १ डिसेंबर १९२९.
जधीं - जेव्हां, ज्या दिवशी.
तधीं - तेव्हां, त्या दिवशी.
पाचू (पाच) - एक प्रकारचे रत्‍न.
पिसे - वेड.
मोद - आनंद
सान - लहान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.