A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या भावाला माझी माया

जीव भोळा खुळा, कसा लावू लळा
देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे

आई बाबांची सावली सरं
छाया भावाची डोईवर उरं
आई अंबाबाई, तुला मागू काही
बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे

भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
त्याची कीर्त अशी, जाता दाही दिशी
माय लक्ष्मी त्याच्या मागं पळू दे

बायको मिळंल भावाला देखणी
चपट्या नाकाची, डोळ्यानं चकणी
वैनीबाई जरा, त्याला शहाणं करा
वर्षा-वर्षाला त्याचा पाळणा हलू दे
उदंड - पुष्कळ.