A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या छकुलीचे डोळे

माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव
बाई, कमळ कमळ, गोड चिडीचं ग नाव

जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई खडीसाखरेचे खडे

सार्‍या जगाचं कौतुक, इच्या झाकल्या मुठीत
कुठे ठेवू ही साळुंकी, या डोळ्यांच्या पिंजर्‍यात

कसे हासले ग खुदकन माझ्या बाईचे ओठ
नजर होईल कोणाची, लावु द्या ग गालबोट