A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या गालाला पडते खळी

माझ्या गालाला पडते खळी
सख्या मी दूधखुळी भोळी

दो नयनांचे दोन आरसे
मूर्ती सखया तुझीच हासे
मनोमंदिरी माझ्या लपली

हृदय-दिलरुबा तुझाच बरवा
छेडित बसला जरी पारवा
झंकाराची जादू आगळी

होइल अपुले प्रेम निरंतर
तुटता दोघांमधले अंतर
भाग्यवती मी जगावेगळी