A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या मनात विणिते नाव

माझ्या मनात विणिते नाव ग
कसं सांगू? अमोल त्याचा भाव ग

नाव त्यांचं नाजुक मोरपीस
छळिते मला ग लाजरीस
काळजाचा नवखा गोड घाव ग

माझ्या मनात लाखदा मी घोकते
ओठांतून फुटेना बाई गुज ते
माझा भारीच लाजरा स्वभाव ग

त्यांच्या नावात आगळा आनंद ग
वेड लावी हा पुनवेचा चांद ग
कशि दावू मोलाचि माझि ठेव ग
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.