माझ्या मराठी मातीचा
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्याखोर्यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान
हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्यासंगे जागतील
मायदेशांतील शिळा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्याखोर्यातील शिळा
हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान
हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्यासंगे जागतील
मायदेशांतील शिळा
| गीत | - | कुसुमाग्रज |
| संगीत | - | कौशल इनामदार |
| स्वर | - | कल्याणी पांडे-साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर |
| गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
| आद्य | - | आरंभीचा / मूळचा. |
| ग्वाही | - | खात्री. |
| दुर्दम | - | अजिंक्य. |
| द्वाही | - | दवंडी. |
| ललाट | - | कपाळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












कल्याणी पांडे-साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर