A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझ्या वडिलांची मिरासी

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ।
तुझी चरण सेवा पांडुरंगा ॥१॥

उपवास पारणे राखिला दारवंटा ।
केला भोगवटा आह्मां लागी ॥२॥

वंश परंपरा दास मी अंकिता ।
तुका मोकलिता लाज कोणा ॥३॥
दारवंट - वेस, उंबरा.
मिराशी - वतनदार.
मोकलणे - पाठविणे / मोकळा सोडणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.