A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला हवा ग असाच

मला हवा ग असाच संसार हवा
गोड गोड खाया आणि बघाया रोज सिनेमा नवा नवा
मला हवा ग असाच संसार हवा

अशी मिळावी सासू भांडी लागंल घासू
नवरा लई विश्वासू माझं पुशिल आसू
रुबाब माझा बघून राजा विसावा देईल जवातवा
मला हवा ग असाच संसार हवा

मानाची मोठी जाव जर खेळेल डाव
इलाज मजला ठावं, नाही देणार भाव
नव्या युगाचा तो धोक्याचा दाविन तिजला दिवा दिवा
मला हवा ग असाच संसार हवा

वैभव माझं मोठं, कुणी लाविल बोटं
धन्याला सांगून खोटं कुणी फुगविल पोट
भर रस्त्याला गाठून त्याला चांगलाच देईन दवा दवा
मला हवा ग असाच संसार हवा

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.