मल्हारी माझा मल्हारी
मल्हारी माझा मल्हारी
भर्तार माझा मल्हारी
नांदते गुणी गोजिरी प्रीत जेजुरी
भर्तार माझा मल्हारी
बाळपणी लगीन लागलं
सोन्याचं सूप वाजलं
लाखोगणती वर्हाडी आलं बघाया नवरी
पंचकल्याणी घोड्यावर
खंडेराव होउनी स्वार
मिरविता मला चौफेर, उठे ललकारी
केतकी सुगंधी काया
वाहुनी देवाच्या पाया
हळदीची कीर्त उधळाया आली सुंदरी
भर्तार माझा मल्हारी
नांदते गुणी गोजिरी प्रीत जेजुरी
भर्तार माझा मल्हारी
बाळपणी लगीन लागलं
सोन्याचं सूप वाजलं
लाखोगणती वर्हाडी आलं बघाया नवरी
पंचकल्याणी घोड्यावर
खंडेराव होउनी स्वार
मिरविता मला चौफेर, उठे ललकारी
केतकी सुगंधी काया
वाहुनी देवाच्या पाया
हळदीची कीर्त उधळाया आली सुंदरी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर, शाहीर साबळे |
चित्रपट | - | पावनखिंड |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लोकगीत |
पंचकल्याणी | - | ज्याच्या अंगावर पाच शुभ चिन्हे आहेत असा. |
भर्तार (भर्ता) | - | नवरा, पती / स्वामी. |