A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन हे खुळे कसे

मन हे खुळे कसे- गगनी पाखरू जसे
गंधवारा बिलगताना त्यास भुलते कसे

आकाशाची गहन निळाई
तशी कुणाची ओळख होई
एक अनामिक हुरहुर लावी जन्‍मभरीचे पिसे

मेघाआडुनी कुणी बोलवी
अमृतजादू करून दाखवी !
व्याकुळतेच्या भाळी केवळ पाण्याचे आरसे

ऋतू फुलांच्या गावी येई
भ्रमर मिठीचे गाणे गाई
माळावरती अता सुरांचे उदासवाणे ठसे
पिसे - वेड.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.