A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मनात नसता तुझ्या गडे

मनात नसता तुझ्या गडे
नकळत का मग असे घडे

डोळ्यातल्या किलबिलल्या
निळसर मैना इवलाल्या
गालावरी सरसरली कमलदलांची पखरण ही
नजर लावता तुझ्याकडे

खट्याळ वारा पिसाळला
मादक दर्या उफाळला
देहावरी थयथयुनी मणीमोत्यांचे कणकणही
दिव्य साज हा कसा चढे

विजय मिळवुनी तुझ्यावर
पदर चालला वार्‍यावर
लज्जाभये फिरुनी सये, आवरसी मन अवखळ हे
मनात नसता प्रीत जडे
पखरण - सडा / उधळण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.