मनीं जे दाटले तुला पाहुनी
मनीं जे दाटले तुला पाहुनी, सांगू कसे?
हृदय शब्दांत ग आणावे कसे? सांगू कसे?
क्षणी एकाच ओझरती जराशी दिसुनी गेलीस तू
तरी मी का उभा वळणावरी ते, सांगू कसे?
तुझ्या नजरेतली जादू, तुझ्या चालीतला डौल
कधी उतरेल ही भूल कशी ते, सांगू कसे?
सुखाची गोड कळ दुखरी कशाला देऊन गेलीस तू?
अनाहूत त्या क्षणांचे गूढ नाते, सांगू कसे?
हृदय शब्दांत ग आणावे कसे? सांगू कसे?
क्षणी एकाच ओझरती जराशी दिसुनी गेलीस तू
तरी मी का उभा वळणावरी ते, सांगू कसे?
तुझ्या नजरेतली जादू, तुझ्या चालीतला डौल
कधी उतरेल ही भूल कशी ते, सांगू कसे?
सुखाची गोड कळ दुखरी कशाला देऊन गेलीस तू?
अनाहूत त्या क्षणांचे गूढ नाते, सांगू कसे?
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | मीना खडीकर |
स्वर | - | श्रीकांत पारगांवकर |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, भावगीत |
अनाहूत | - | अनपेक्षित, आकस्मिक. |