A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मारू बेडुकउडी गड्यांनो

मारू बेडुकउडी गड्यांनो घालू या लंगडी
लपाछपी खेळता देउ या झाडामागे दडी !

सुट्टी लागली सरली शाळा
कोण पहाटे उठतो खुळा !
"अभ्यासाला बसा !" कुणी ना ओरडते घडीघडी !

गावाबाहेर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधी
सळसळणार्‍या लाटांमध्ये घेईल कोणी बुडी !

कुणी पाडतिल चिंचा बोरे
"एक आकडा मलाही दे रे?"
झाडाखाली कुणी बापडा लाविल लाडीगुडी !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.