म्हणतें जाईन सोडून राधे
म्हणतें जाईन सोडून राधे तुझा शेजार
तुझ्या खट्याळ कान्ह्यानं मला केलं बेजार
वेणीफणी करून, काजळकुंकू लेऊन
माझा ठेवणींतला शालू भरजरी
नेसून निघालें मी बाहेरी
आला कसा कुठून
पिचकारी घेऊन
गेला विसकटून मोलाचा साजशिणगार
माझा साज शिणगार
जातां मार्गामधून, खडे मारी मागून
माझा दहिदुधें भरला घडा
टाकी फोडून कसा ग धडधडा
सासू छळते मला
जीव वेडावला
सुना सुना वाटे ग मला सारा संसार
माझा सारा संसार
मोठा अवखळ कान्हा, पाडी भूरळ मना
कुंजवनांत मुरली घेउनी
छेडी मंजूळ राग-रागिणी
झालें गेलें विसरून
जीव येतो फुलून
लागे वाजाया अंतरीं प्रेमसतार
तुझ्या खट्याळ कान्ह्यानं मला केलं बेजार
वेणीफणी करून, काजळकुंकू लेऊन
माझा ठेवणींतला शालू भरजरी
नेसून निघालें मी बाहेरी
आला कसा कुठून
पिचकारी घेऊन
गेला विसकटून मोलाचा साजशिणगार
माझा साज शिणगार
जातां मार्गामधून, खडे मारी मागून
माझा दहिदुधें भरला घडा
टाकी फोडून कसा ग धडधडा
सासू छळते मला
जीव वेडावला
सुना सुना वाटे ग मला सारा संसार
माझा सारा संसार
मोठा अवखळ कान्हा, पाडी भूरळ मना
कुंजवनांत मुरली घेउनी
छेडी मंजूळ राग-रागिणी
झालें गेलें विसरून
जीव येतो फुलून
लागे वाजाया अंतरीं प्रेमसतार
गीत | - | संजीवनी मराठे |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | सुधा माडगावकर |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |