A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी जाया धर्ममया

मी जाया धर्ममया
पतिवच पाळित कैकयदुहिता
रविकुलप्रखरव्रता या

मौन धरिती धीमंत सुमंतही
जाणुनि अनृत वरिता
शापशबल व्रतवंचित जीवित
सत्त्वचि जाई विलया
अनृत - असत्य.
जाया - पत्‍नी.
दुहिता - कन्या.
वरिता - पती.
शबल - गढूळ.