मी नयनस्वप्न वेडा
मी नयनस्वप्न वेडा, तू धार आसवांची
तुज ओढ तापण्याची, हृदयास जाळण्याची !
मी भावगंध रेखा तुजला किती कथाव्या
ना बोलता कहाण्या तुजशी किती वदाव्या
नजरेत अक्षरांच्या पुष्पांजली वहाव्या
माधुर्य मागतो मी, तुज आस संपण्याची !
शब्दांतुनी तुझ्या गे नाकार सर्व गाजे
जगणेही भासते हे आता अयोग्य ओझे
वैराण भावनांचे आकाश आज माझे
पाऊलवाट तव ती शिशिरातल्या जिण्याची !
तव कोवळ्या मनाला का अर्थ ना कळावा?
अजुनी तुला कसा ना स्वर आर्त आकळावा
मी छेडता तराणा का सूर ही ढळावा?
वीणेस ओढ लागे का आज भैरवीची?
तुज ओढ तापण्याची, हृदयास जाळण्याची !
मी भावगंध रेखा तुजला किती कथाव्या
ना बोलता कहाण्या तुजशी किती वदाव्या
नजरेत अक्षरांच्या पुष्पांजली वहाव्या
माधुर्य मागतो मी, तुज आस संपण्याची !
शब्दांतुनी तुझ्या गे नाकार सर्व गाजे
जगणेही भासते हे आता अयोग्य ओझे
वैराण भावनांचे आकाश आज माझे
पाऊलवाट तव ती शिशिरातल्या जिण्याची !
तव कोवळ्या मनाला का अर्थ ना कळावा?
अजुनी तुला कसा ना स्वर आर्त आकळावा
मी छेडता तराणा का सूर ही ढळावा?
वीणेस ओढ लागे का आज भैरवीची?
गीत | - | शांताराम नांदगावकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | दशरथ पुजारी |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला, नयनांच्या कोंदणी |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
Print option will come back soon