A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी तुमची जाहले

या पायावर जीव वाहिला, साक्षी ही पाऊले
मी तुमची जाहले, जिवलगा, मी तुमची जाहले!

चल ग राणी, हिरव्या रानीं, गुलुगुलु गोष्टी करू
चला नदीच्या तीरी राया, वाळूवरती फिरू
मंजुळवाणे ऐकिव गाणे, मन त्याला भुलले
मी तुमची जाहले, जिवलगा, मी तुमची जाहले!

चल ग राणी, रात चांदणी, चांदण्यात न्हाऊ
धारांखाली मल्हारांतिल प्रीतगीत गाऊ
धारांहुनही सूर सुखाचे तुझिया ओठांतले
मी तुमची जाहले, जिवलगा, मी तुमची जाहले!

 

Random song suggestion
  पं. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा