मी वार्याच्या वेगाने आले
मी वार्याच्या वेगाने आले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
बेहोष वेळीं अशा गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा
कुठे पान नादांत हालें, तसे फूल लाजून बोलें
तुझी पाकळी मीच झाले
आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नांळताना
श्वासांतही कैफ आला हे चांदणें सांडताना
तुझा स्पर्श होताच गालीं, मनीं मल्मली हालचाली
क्षणीं चंद्र गंधांत न्हाले
तुझ्या प्रीतीने धुंद झाले
वसंतातले रंग ल्याले
अशा रेशमी सांजवेळी
तुझे गीत झंकारताना सूर प्याले
बेहोष वेळीं अशा गाण्यात आली नशा
आनंद ओसंडताना बेधुंद झाल्या दिशा
कुठे पान नादांत हालें, तसे फूल लाजून बोलें
तुझी पाकळी मीच झाले
आभाळ गंधाळताना, दो जीव स्वप्नांळताना
श्वासांतही कैफ आला हे चांदणें सांडताना
तुझा स्पर्श होताच गालीं, मनीं मल्मली हालचाली
क्षणीं चंद्र गंधांत न्हाले
गीत | - | शांताराम नांदगावकर |
संगीत | - | अरुण पौडवाल |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
गीत प्रकार | - | भावगीत |