मिटुन डोळे घेतले मी
मिटुन डोळे घेतले मी तरीही त्यांना पाहते
कोण मी अन् कोण ते !
गाइल्यावाचून त्यांनी गीत त्यांचे ऐकते
भेटल्यावाचून त्यांना गुज माझे सांगते
नाव नाही पुशियले मी, मीच काही योजिते
तेच ओठी घोळताना मी स्वत:शी लाजते
भावनांचा भास का हा? कल्पनांची कूजिते?
वचन नाही घेतले मी वाट तरीही पाहते
बोलले काहीच ना ते, मी न काही जाणते
जोडते जिवांस दोन्ही मुग्ध नाते कोणते?
कोण मी अन् कोण ते !
गाइल्यावाचून त्यांनी गीत त्यांचे ऐकते
भेटल्यावाचून त्यांना गुज माझे सांगते
नाव नाही पुशियले मी, मीच काही योजिते
तेच ओठी घोळताना मी स्वत:शी लाजते
भावनांचा भास का हा? कल्पनांची कूजिते?
वचन नाही घेतले मी वाट तरीही पाहते
बोलले काहीच ना ते, मी न काही जाणते
जोडते जिवांस दोन्ही मुग्ध नाते कोणते?
| गीत | - | ग. दि. माडगूळकर |
| संगीत | - | वसंत पवार |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | बाळा जो जो रे |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |
| कूजन | - | आवाज. |
| गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
| मुग्ध | - | अस्पष्ट / अबोल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












आशा भोसले